…तरीही आता युती शक्य नाही : संजय राऊत

मुंबई : ‘भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,’ असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर बोलत होते. तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले. त्यावर खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले आहे. बलात्कार, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेले एकंदरीत वातावरण हे भ्रमनिरास करणारे असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय, जिथे पक्षाचा स्वाभिमान दुखावला जाईल, ती पदं आपण स्वीकारणार नसल्याचे सांगत त्यांनी राज्यसभा उपसभापतीपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला.

दरम्यान, विरोधकांचाही त्यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. “शिवसेनेने आवाज उठवल्यावर अजगरासारखा निपचित पडलेला विरोधी पक्ष जागा झाला आहे.” आहे. दुसरीकडे काल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जावून भेट घेतली.  दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील समोर आलेला नाही. मात्र, राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात इतक्या गुप्त भेटीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)