…तरीही अमेय वाघने पूर्ण केला नाटकाचा प्रयोग

चित्रपटसृष्टी म्हटले की, काम, जबाबदारी आणि दिलेला वेळ पाळणे या गोष्टी अतिशय काटेकोरपणे पाळल्या जातात. मग त्यासाठी तुमच्या कोणत्याही अडचणीचा विचार तिथे होईलच असे नाही. अशीच एक भावनिक घटना सध्या मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ याच्या आजोबांचे काल निधन झाले. परंतु, अमेयने आजोबांच्या निधनानंतर अंत्यविधी उरकला आणि त्यानंतर तो लगेचच नाटकाच्या प्रयोगासाठी रवाना झाला. कुटुंबावर दु:खाचा प्रसंग ओढावला असतानाही त्याने कामालाच प्राधान्य दिले. याविषयीची माहिती अमेयचा मित्र निपुण धर्माधिकारी याने फेसबुकवर एक पोस्ट टाकून दिली आहे.

‘कामाला प्राधान्य देणारे आणि त्याबद्दल प्रामाणिक असलेले लोक फार कमी बघायला मिळतात. अशा लोकांच्या संगतीत रहायला बरं वाटतं आणि त्यांचा अभिमानही वाटतो. काल रात्री उशिरा आजोबांचं निधन होऊन, आज पहाटे आणि दिवसा सगळे क्रियाकर्म आटोपून दुपारी दुसऱ्या गावी जाऊन ‘अमर फोटो स्टुडिओ’चा प्रयोग करणाऱ्या अमेय वाघला सलाम’,

असे लिहित निपुणने ही पोस्ट केली. त्याची ही पोस्ट अनेकांनीच लाइक केली त्यासोबतच अमेयच्या या वृत्तीला दादही दिली.

कामाला प्राधान्य देणारे आणि त्याबद्दल प्रामाणिक असलेले लोक फार कमी बघायला मिळतात.अशा लोकांच्या संगतीत रहायला बरं वाटतं…

Posted by Nipun Avinash Dharmadhikari on Saturday, 24 March 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)