तरडेत घरफोडी; 44 हजारांचा ऐवज लंपास

लोणी काळभोर – घरातील सर्वजण झोपले आहेत याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून, आत प्रवेश करून लोखंडी कपाटांत ठेवलेले 2 तोळा वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व 3 हजार रुपये रोख रक्‍कम असा एकूण 44 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना तरडे (ता. हवेली) येथे घडली. याप्रकरणी उरुळी कांचन दुरक्षेत्रात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र काशिनाथ कुंजीर (वय 33) यांनी फिर्यद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)