तरटगांवात 25 वर्षाचा इतिहास मोडीत

File photo

ग्रामपंचायत बिनविरोधसाठी सर्वपक्षिय एकत्र
रेडा – तरटगांव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत गावाच्या हितासाठी गावकऱ्यांनी गटतट विसरून, सर्वपक्षिय गावातील पुढाऱ्यांनी एकत्र येत गेल्या 25 वर्षेचा इतिहास मोडून काढत ग्रामपंचायत बिनविरोध करून आदर्श निर्माण केला आहे. यामुळेच गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली जात असेल तर गावासाठी पाहिजे तितका निधी जिल्हा परीषदेच्या माध्यमातून देऊ, अशी ग्वाही पुणे जिल्हा परीषदेचे सदस्य अभिजित तांबिले यांनी दिली.

मंगलसिध्दी परीवाराचे प्रमुख ऍड. राजेंद्र तांबिले, राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, छगनराव तांबीले, पीआरपीचे युवा नेते संजय सोनवणे यांनी गावचे सरपंच पोपट तुकाराम माने व तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेखा दादासो भांगे, शंकर हनुमंत ननवरे, अमोल नारायण माने, राजेंद्र विजय सोनवणे, लक्ष्मी अभिजीत सोनवणे यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश मिळवले. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष ननवरे, माजी सरपंच कुबेर भांगे, माजी उपसरपंच बाबूराव भांगे, संजय सोनवणे, सौदागर ननवरे, किसन भांगे, बाळासाहेब सरडे, अनिल भांगे, अनंता ननवरे, बाळासो ननवरे, नागेश भांगे, इंद्रजित भांगे, हनुमंत सोनवणे, सागर ठवरे, गणेश दडस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)