…तरच नृत्याचा प्रवास सुकर होईल – मनिषा साठे

पिंपरी – ततकारातील जरब, आघात आणि देहबोलीतून ततकाराची स्पष्टता दाखवता आली पाहिजे. यासाठी सराव आवश्‍यक आहे तेव्हाच तुमचा नृत्याचा प्रवास सुकर होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध नृत्यांगना गुरु पंडिता मनिषा साठे यांनी चिंचवड येथे केले.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून चिंचवडच्या पायल नृत्यालयाच्या वतीने नृत्यानुग्रह या कथकच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. चिंचवडच्या घारेशास्त्री सभागृहात ही कार्यशाळा झाली. यावेळी नृत्यालयाच्या संचालिका पायल गोखले उपस्थित होत्या.

-Ads-

कार्यशाळेमध्ये मनिषा साठे यांनी विद्यार्थिनींना कथकबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत 50 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कथक नृत्यातील जगप्रसिद्ध अशा गुरु मनिषा साठे यांच्याकडून कथक शिकण्याची संधी उद्योगनगरीतील विद्यार्थ्यांना मिळाली. मनिषा साठे यांनी विविध रचनांमधून हस्तकांचे सौंदर्य आणि ततकारमधील स्पष्टता विद्यार्थिनींना समजावून सांगितली. तोडे, परन, जरब, चलन यांसारखे कथकमधील आवश्‍यक असे प्रकार शिकवले.

मनिषा साठे म्हणाल्या की, हस्तकाचे संचलन करताना नर्तकाच्या शरीराची सूक्ष्म हालचाल होते. त्यावर हस्तकाचे सौंदर्य अवलंबून असते. पढंत करताना नर्तकाने आपल्या देहबोलीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे. लयींशी खेळणे हा ततकाराचा गुणधर्म आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पायल गोखले म्हणाल्या की, ज्येष्ठ नर्तकांना आपण नृत्य करताना कार्यक्रमांत पाहतो. या नर्तकांकडून नृत्य शिकण्याची संधी मिळावी या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. यातून या दिग्गज गुरुंचा नृत्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, नृत्यरचनेतील बारकावे, सादरीकरणामागचा विचार या गोष्टी शिकता येतात. कलाकाराकडून कला शिकण्याबरोबरच ती कला कशी जगायची याचे संस्कार सहवासातून घडतात हाच या कार्यशाळेचा उद्देश होता, असे त्यांनी नमूद केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)