…तरच चुकीच्या प्रवृत्तींना आळा बसेल!

पिंपरी – शालेय परिसरात तसेच समाजात वावरताना अनेकवेळा मुलींना, महिलांना छेडछाडीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलींनी न घाबरता विरोध केला पाहिजे. तरच चुकीच्या प्रवृत्तींना आळा बसेल. यासाठी पोलीस आपली भूमिका ठामपणे बजावत आहेत. भयमुक्त समाजासाठी पोलीस कटीबद्ध असून अभयदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, असे मत निगडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड यांनी व्यक्त केले.

यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बसविण्यात आलेल्या तक्रार पेटीच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह शरद इनामदार, प्राचार्य सतीश गवळी, सुमती पाटसकर, ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक विवेक धडफळे, प्रिती वाघोलीकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रशांत आरदवाड म्हणाले की, मुलींना, महिलांना जर कोणी त्रास देत असेल तर निर्भीडपणे आपली तक्रार सदर पेटीत टाकावी. या तक्रारपेटीची चावी केवळ पोलीस आयुक्तांकडे असल्याने तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. निनावी तक्रार देखील देऊ शकता. मात्र ही तक्रार खरी आणि स्पष्ट स्वरूपात असावी. तसेच आपण केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही तर अशा पोलिसांची देखील माहिती आपण पोलीस आयुक्तांना या तक्रार पेटीत करू शकता, असे त्यांनी सांगितले.

अपमानास्पद शेरेबाजी, छेडछाड, क्रूर वागणूक, विनयभंग, दादागिरी, अमली पदार्थ विक्री, लैंगिक अपराध, कॉलेजमधील रॅगिंग, मुलींचा पाठलाग करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, प्रेशर हॉर्न, रिव्हर्स हॉर्न, विद्यार्थी वाहतूक संदर्भातील तक्रारींची दखल पोलीस आयुक्त घेणार आहेत. सामान्य नागरिकांत देखील एक पोलीस दडलेला असून तो जागृत असणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

प्राचार्य सतीश गवळी, शरद इनामदार यांनीही मार्गदर्शन केले. जोत्स्ना एकबोटे व कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन शिवाजी अंबिके यांनी केले. तर आभार वंदना धुमाळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)