…तरच गुन्हेगारीला आळा शक्‍य – विश्वास नांगरे पाटील

पिंपरी – लोकांच्या गरजा आणि प्रश्न समजून घेऊन पोलीस प्रशासनाने जनतेशी संवाद साधावा. गरजा ओळखून पोलिसिंग केले गेले, तर पोलीस व नागरिक यांच्यातील अंतर कमी होऊन वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालणे शक्‍य होईल, असे मत कोल्हापूर पोलीस परिमंडलचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित मोरया युथ फेस्टिव्हलचे उद्‌घाटन विश्‍वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, नगरसेवक बाबू नायर, नगरसेविका अनुराधा गोरखे, कामगार नेते इरफान सय्यद, अमित गोरखे आदी उपस्थित होते. यावेळी ऍड. सचिन पटवर्धन, राहुल सोलापूरकर यांनी नांगरे पाटलांची प्रकट मुलाखत घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावचा खविस ते दहशतवादी कसाबला पकडण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला या प्रश्नाला उत्तर देताना नांगरे पाटील म्हणाले, भूत ही एका गावातील चर्चा असते. मला एकदा खोलीत रात्रभर कोंडून ठेवण्यात आले. मला खूप भीती वाटली. सकाळपर्यंत जिवंत राहू का, असा प्रश्न मनात आला. परंतु, दमलो असल्याने झोप लागली. दुसऱ्या दिवशी सहीसलामत खोलीतून बाहेर आल्यानंतर मनातील भीती पळून गेली. साहस आणि भीती यामध्ये खूप कमी अंतर असते. माझे वडील पैलवान होते. त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा होती. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले. त्यातूनच आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत गेलो.

26/11 च्या मुंबई हल्ल्या वेळी ताज हॉटेलची पूर्वी रेकी केलेली होती. त्याचा फायदा झाला. त्यावेळी नागरिक आणि सहकाऱ्यांचे मृतदेह समोर होते. सर्वत्र रक्‍ताचा सडा पडलेला होता. क्षणभर भीती वाटली पण, तद्‌नंतर शांतचित्ताने धाडस दाखवत दहशतवाद्यांवर प्रत्युत्तरा दाखल गोळीबार करत त्यांचा खात्मा केला. कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळे यांनी शिताफीने कसाबला घट्‌ट पकडले. त्यामुळे भारतावर सीमेपलिकडून होणारा दहशतवाद जगासमोर आणता आला, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी रांगोळी, पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. सुयश खटावकर यांनी आभार मानले. ऍड. सचिन पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. राजेश पाटील, ज्योतिका मलकानी, किरण येवलेकर, प्रा. शिल्पागौरी गणपुले, चेतन फेंगसे, देवदत्त कशाळीकर यांनी संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)