”द हीरो’ चित्रपटातून ‘प्रियांका’ने केले हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण

प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस आहे, तिने विश्वसुंदरीचा किताबही पटकावल्यानंतर तमिळ चित्रपटातून आपल्या सिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘द हीरो’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूड मध्ये एंट्री केली.

या चित्रपटामध्ये तिची दुय्यम भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे तिचे पूर्ण लक्ष त्यानंतर आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटावर होते. या चित्रपटाला परीक्षकांकडून फार चांगली मते मिळाली नाहीत. परंतु, या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर कमाल केली.

या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर मात्र प्रियांकाकडे ग्लॅमरस भूमिकांची रांग लागली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)