नारायणगाव- जुन्नर तालुक्‍यातील जेष्ठ तमाशा कलावंत मालती इनामदार यांनी तब्बल 22 वर्षांनी आपल्या डोक्‍यावरील जटांचं ओझं कमी केले आहे. रविवार (दि. 2) सकाळी 11 वाजता नारायणगाव येथे इनामदार यांच्या घरी अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिता जाधव यांनी या जटा काढून त्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढले आहे.
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या व जेष्ठ तमाशा सम्राज्ञी विठ्ठबाई भाऊमांग नारायणगावकर यांची कन्या व तमाशा कलावंत मालती इनामदार यांनी मागील 22 वर्षांपासून आपल्या केसांच्या जटांचा सांभाळून ठेवल्या होत्या. अंधश्रद्धेच्या पोटी वाढविलेल्या जटा अंनिंसच्या कार्यकर्त्यांनी काढून त्यांना अंधश्रद्धेतून मुक्त केले आहे.
अज्ञान, अंधश्रेद्धेची परंपरा जोपासत मालती इनामदार यांनी आपल्या केसांच्या जटा आजपर्यंत वाढविल्या होत्या. 1996 मध्ये थोड्या जटा आल्या होत्या. त्यावेळी कुटुंबातील लोकांनी देवीच्या जआ आहेत म्हणून काढू दिल्या नाहीत. या जटा काढल्या तर अंगात देवी येईल, देवीचा प्रकोप होईल, घरातल्या इतर लोकांना त्रास होईल अशी भीती दाखविल्याने त्यांनी आजपर्यंत केसांच्या जटा वाढविल्या होत्या. देवाचा कोप होईल याची आम्हाला भीती असते म्हणून मी या जटा वाढविल्या होत्या. यावेळी जिल्हा महिला संघटक ऍड. साधना बाजारे, जिल्हा सचिव मनोहर शेवकरी, भाऊ विजय सावंत, राजेश सावंत, विशाल इनामदार, सून रुपाली इनामदार आदी उपस्थित होते. मालती इनामदार यांच्या जटा काढण्यासाठी एका व्यक्तीने 50 हजार रुपये खर्च येईल असे सांगितले होते.

  • अंधश्रद्धेमुळे महिला जटा काढायला तयार होत नाहीत. कुटुंबातील लोक ही जटा काढायला तयार होत नाहीत. कुटुंबाचा सपोर्ट असेल तर जटा काढण्यास महिला तयार होतील. आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून 71 महिलांच्या जटा काढल्या आहेत. असा प्रकार कुठे होत असेल तर त्यांनी 9422305929 यावर संपर्क साधावा.
    नंदिता जाधव, कार्यध्यक्षा, अंनिंस 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)