तमसो मा ज्योतिर्गमय!

पिंपरी – आषाढी अमावस्या दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त पिंपरी-चिंचवड कामगारनगरीतील विविध शाळांमध्ये दीपपूजनाचा उपक्रम राबवत तमसो मा ज्योतिर्गमय असा संदेश देण्यात आला. तसेच मंदिर, घरोघरी दिव्याचे पारंपारिक पध्दतीने कणकेच्या दिव्यांचे पूजन करत सुख-समृध्दीसाठी साकडे घालण्यात आले.

आषाढातील अमावस्या मंगलमय मानली जाते. दिव्यांची अमावस्या म्हणून हा दिवस साजरा केला जातो. घरोघरी सर्व दिवे व समई स्वच्छ करुन त्याची पूजा करण्यात आली. कणिकेचे गोडाचे दिवे तयार करुन दुधा-तुपासोबत त्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. चऱ्होली, मोशी, चिखली, रावेत या शहरालगतच्या ग्रामीण भागात बाजरीचे दिवे करण्याची प्रथा आहे. आषाढी व त्यातच शनि अमावस्या आल्याने यावेळच्या अमावस्येला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे शहरातील विविध मंदिरांमध्ये उत्साहात दीप पूजन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवनगर शिक्षण मंडळाच्या यमुनानगर येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिरमध्ये दीप पुजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ आंबले होते. अंधारात उजेड निर्माण करणारी, विझलेल्या दिव्यांना पेटवून सर्वांना समान उजेड देणारी दिव्याची ज्योत नेहमी वर असते. कारण तिचे जन्मस्थान ब्रह्मांड आहे. माणसाने देखील ब्रह्मांड नायकाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. शिक्षिका अर्चना पाटील यांनी मार्गदर्शन केले. सीमा राठोड यांनी प्रास्ताविक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)