तब्बल 28 वर्षांनंतर शाळेतील आठवणींना उजाळा

चाकण येथील श्री शिवाजी विद्यामंदिरातील माजी विद्यार्थी आले एकत्र

चाकण- येथील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेत 1989 -90मध्ये दहावीचे शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेले पाच तुकड्यां मधील सुमारे 200 विद्यार्थी-विद्यार्थिनी रविवारी (दि. 6) तब्बल 28 वर्षांनी शाळेमध्ये एकत्र येऊन जुन्या आठवणींमध्ये रमले होते. यावेळी तत्कालीन शिक्षक उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. चाकण येथील श्री शिवाजी विद्यालयात मार्च 1990मध्ये म्हणजे 28 वर्षांपूर्वी दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा स्नेहमेळावा साजरा केला. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून स्नेहमेळावा घेतला होता. 200 विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले होते. जुन्या शालेय आठवणींना उजाळा देताना विद्यार्थी आणि शिक्षकांनी शालेय काळात आलेले अनुभव कथन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय वाडेकर, प्रशालेचे मुख्यध्यापक अरुण देशमुख, मोरे सर, पोखरकर सर, घाटकर सर, शिरसाठ सर, खोडदे सर, महाजन सर आदी शिक्षकगण उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. विजय गोकुळे, डॉ. स्वाती सुराणा, तेजस्विनी वाडेकर, संदीप जाधव,प्रवीण गोरे,डॉ किशोर घुमटकर, मीनाक्षी शिंदे, वैशाली मंडलिक,अनिल फडके, नीता यादव, शंकर डोंगरे, प्रताप चव्हाण, गोविंद खराबी, बाळासाहेब शिळवणे,नवनाथ भुजबळ, सुरेश जाधव, अविनाश मु-हे, सुभाष सोनवणे, शकिला मुजावर, सुनील नाणेकर, राजेंद्र नाणेकर, मल्हारी धनवटे, यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी शाळेला एक एलसीडी प्रोजेक्‍टर देणगी स्वरुपात देण्याचे माजी विध्यार्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नाणेकर, संदिप नाणेकर व सुनीता मुंगसे तर डॉ. विजय गोकुळे यांनी आभार केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)