तब्बल 26 वर्षांनंतर पुन्हा अकबर आणि अँथनी एकत्र !

मुंबई : तब्बल 26 वर्षांनंतर पुन्हा एकदा महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र पहायला मिळणार आहे. गुजराती लेखक-दिग्दर्शक सौम्या जोशी यांच्या 102 नॉट आऊट या नाटकावर आधारित चित्रपट बनवला जात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी 102 वर्षांच्या वृद्धाची, तर ऋषी कपूर यांनी 75 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अमिताभ हे यात ऋषी कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
गेल्या बुधवारी या चित्रपटाचे मुंबईत शूटिंग सुरु झाले असून, उमेश शुक्‍ला चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा एक फोटो तरण आदर्श यांनी ट्‌वीट केला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडी तब्बल 26 वर्षांनंतर एकाच चित्रपटात दिसणार आहेत. शिवाय, ही जोडी पहिल्यांदाच गुजराती भूमिका साकारणार आहे. बाप-लेकाच्या नात्यावर चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. जुलै महिन्यापर्यंत शूटिंग पूर्ण होऊन, दोन दिग्गज कलाकारांचा एकत्रित चित्रपट नव्या पिढीला पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक उमेश शुक्‍ला यांनी याआधी अभिषेक बच्चन, असीन, ऋषी कपूर आणि सुप्रिया पाठक या कलाकारांना घेऊन ऑल इज वेल नावाचा चित्रपट बनवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)