तब्बल 17 हजार किलो स्फोटके जप्त

बांका (बिहार) – बिहार मधील एका गावातून तब्बल 17 हजार किलो वजनाची स्फोटके पोलिसांनी जप्त केली आहेत. माओवाद्यांना ही स्फोटके पुरवली जाणार होती अशी माहिती मिळाली आहे. प्रत्येकी 50 किलो वजनाची अमोनियम नायट्रेटची ही स्फोटके 340 पोत्यांमध्ये ठेवण्यात आली होती.

एका घरामध्ये ही स्फोटके दडवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथे छापा घालून ही स्फोटके जप्त केली. हे घर स्फोटके पुरवणाऱ्या कंत्राटदाराचेच आहे आणि तो नियमीतपणे माओवाद्यांना ती पुरवण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरारी आहे पण त्याच्या साथीदाराला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिहार मध्ये प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात पोलिसांना स्फोटकांचा साठा आढळून आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)