तब्बल 17 दिवसानंतर मेधा पाटकर यांचे उपोषण मागे

मध्य प्रदेश – गेल्या 17 दिवसांपासून मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील चिकलदा गावात सरदार सरोवरावर बांधण्यात येणा-या धरण्याच्या उंची विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी उपोषण सुरू केले होते. तब्बल 17 दिवसानंतर पाटकर यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतल्याची माहिती धार जेलचे अधीक्षक सतीश कुमार उपाध्याय यांनी दिली. आज (रविवार) सकाळी मेधा पाटकर यांनी सरबत पिऊन उपोषण मागे घेतले आहे, अशी माहिती कुमार यांनी दिली.

सरदार सरोवरावरील धरणाची उंची वाढवली तर नर्मदा नदीच्या परिसरातील सुमारे 192 गावांना याचा फटका बसेल. तसेच जवळपास 40 हजार कुटुंब विस्थापित होण्याची भीती व्यक्त करत या सगळ्यांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा पवित्रा मेधा पाटकर यांनी घेतला होता. धरणाच्या उंचील विरोध करत त्यांनी उपोषणाला सुरवात केली होती. यानंतर काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासोबत 11 उपोषणकर्त्यांना जबरदस्ती अटक केली होती. मात्र आता त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)