तब्बल 16 वर्षांनंतर शाळेच्या आठवणींना उजाळा

राजगुरूनगर – महात्मा गांधी विद्यालयाच्या 2002च्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेहमेळावा झाला. मैत्रीची आठवण राहावी, मैत्री कायम स्मरणात राहावी यासाठी प्रत्येक मित्र मैत्रिणीला एक झाड भेट देण्यात आले. तब्बल 16 वर्षांनतर दहावीच्या वर्गात शिकणारे मित्र मैत्रिणी एकत्र आल्या आणि त्यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला. दहावी झाल्यानंतर हे सर्व मित्र पुन्हा मैत्री दिनाच्या दिवसाचे औचित्य साधून एकत्र आले. यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे शाळेसाठी आणि समाजासाठी मोठे योगदान आहे. स्नेहमेळाव्यात अनेक मित्रांनी त्यांचे शालेय जीवन त्यांच्या वाणीतून कथन केले. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ कुणाल तांबे, डॉ. कुंतल जाधव, ऍड. वैभव कर्वे,
डॉ. ओंकार काजळे, रवींद्र पवार, स्वप्नील हिंगे, श्‍वेता गारगोटे, सुनिता वाळकोळी, ज्योती साळुंके, रुपेश पाटोळे, अविनाश कुलकर्णी, परेश वाफगावकर यांनी प्रयत्न केले. आलेल्या सर्व सहकाऱ्यांना रोपे देवून मैत्रीची आठवण ठेवण्यासाचा संदेश दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)