तब्बल 13 वर्षांनी खून, पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यातून महिलेसह तिघांची निर्दोष मुक्तता

पुणे – पैशाच्या देण्या-घेण्याच्या कारणावरून गुंगीचे औषध पाजून गळा आवळून खून करून हात-पाय तोडून, मृतदेह अर्धवट जाळून पोत्यात भरून ओढ्यात टाकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणातून न्यायालयाने घटनेनंतर तब्बल तेरा वर्षांनी महिलेसह तिघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. खेड येथील मुख्य न्यायाधीश एन.के.ब्रम्हे यांनी हा आदेश दिला आहे.
स्वप्निल विठ्ठल लोखंडे (वय 35), नितीन अर्जून जुनावणे (वय 30) आणि मंगल विठ्ठल लोखंडे (वय 50, तिघेही, रा. भीमा टाक़ळी, ता. शिरूर) अशी मुक्तता झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. गोरक्षनाथ काळे, ऍड. गणेश जाधव, ऍड. सचिन तांबे, ऍड. रेटवडे आणि ऍड. सरिता काजळे यांनी काम पाहिले. रविशंकर बाळकृष्ण मेरूकर (वय 42, रा. बावधन) यांच्या खूनाचा तिघांवर आरोप होता. शेलगाव हद्दीतील घोलपवाडी येथे 9 डिसेंबर 2005 रोजी ही घटना घडली. आरोपींनी पैशाच्या वादातून मेककर यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह पोत्यात भरून शोल पिंपळगाव-चाकण रस्तावरील ओढ्यात फेकून दिला होता. त्यानुसार तिघांवर भादवी कलम 302 (खून), 120 ब (कट रचणे) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) नुसार चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील मृतदेह हा कोणाचा आहे, हे सिध्द होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे पोस्टमार्टम रिपोर्टवरून मयतचा अपघाती मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली अथवा त्याला कोणी मारहाण केली, हे सिध्द होत नाही. प्रत्यक्ष अथवा कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नाही, असा युक्तीवाद ऍड. गोरक्षनाथ काळे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)