तब्बल २७ वर्षांपासून फरार खलिस्तानी म्होरक्या जेरबंद

चंडीगड : खलिस्तान संघटनेचा म्होरक्या रणजीत सिंग उर्फ राणा याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल २७ वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता.

गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस राणाचा शोध घेत होते. काही लोक राणा मृत झाल्याचे समजत होते. परंतु तो वेष पालटून राहत असल्याच्या बातम्या देखील मिळवत होत्या. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान सोमवारी राणा हा आपल्या गावी नूरपुर जट्‌टां येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली, अशी माहिती पंजाबचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कुमार शर्मा यांनी माध्यमांना दिली.  पोलिसांनी अटक केल्यानंतर राणा याने गुन्हा कबुल केला असून आपले अन्य तीन साथीदार हयात नसल्याचे सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)