तब्बल १० वर्षानंतर ‘ही’ जोडी पुन्हा एकत्र झळकणार

संजय दत्त व मनीषा कोईराला यांची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘प्रस्थानम’ या तेलुगु सिनेमाच्या रिमेकमध्ये हे दोघे एकत्र दिसतील. संजय दत्त या चित्रपटात मनीषाच्या पतीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. संजय दत्तची आई व दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या ८९व्या जन्मदिनी लखनऊमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

एल्गार, सनम, कारतूस, खौफ, बागी, मेहबूबा या चित्रपटानंतर तब्बल दहा वर्षांनंतर संजय व मनीषा यांची जोडी  एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.  ‘प्रस्थानम’चे दिग्दर्शक देव कट्टा म्हणाले, ‘मला चांगल्या कलाकारांची गरज होती. संजय आणि मनीषाच्या रूपानं मला तसे कलाकार मिळाले आहेत.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)