तब्बल साडेतीन वर्षांनंतर पहिली बैठक

राजगुरुनगर- खेड तालुक्‍यात सार्वजनिक वितरण व्यवस्था व तालुका दक्षता समिती स्थापन झाल्या पासूनच्या साडेतीन वर्षांतील पहिली बैठक बुधवारी (दि.19) रोजी आमदार सुरेश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली खेड तहसीलदार कार्यालयात झाली. यात सदस्यांनी अध्यक्षांसह समितीच्या सचिवांवर प्रश्‍नांचा भडीमार केला.
या बैठकीला तहसीलदार अर्चना यादव, नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, समितीचे सदस्य बाळासाहेब चौधरी, शंकर राक्षे, सचिन मधवे, विनायक लवंगे, दत्ता भालेराव आदि सदस्य उपस्थित होते.
खेड तालुक्‍यात सार्वजनिक वितरण व्यवस्था व तालुका दक्षता समितीस्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकदाही बैठक झाली नसून समिती फक्‍त नावाला आहे का? समितीच्या बैठका वेळेत होणे गरजेचे असून समितीच्या माध्यमातून सार्वजनिक हिताची कामे होणे अपेक्षित आहेत याबरोबरच दक्षता समितिच्या सदस्यांची कामे काय याबाबत नियमाली तयार करावी, रेशनिंग धन्य वाटपाबाबत प्रत्येक दुकानदाराने आलेले धन्य वाटप झालेले धन्य आणि शिल्लक धन्य याचा घोषवारा असलेला फलक दुकानात लावावा. रेशनिंग दुकानदार, अधिकारी आणि समितीचे सदस्य यांची एकत्रित बैठक घ्यावी समितीच्या सदस्याला ओळखपत्र द्यावे, दक्षता समितीच्या कार्यकारिणीचा नाम फलक प्रत्यक रेशन दुकानात लावण्यात यावा, आदी मागण्या समितीचे सदस्य बाळासाहेब चौधरी, विनायक लवंगे, दत्ता भालेराव यांनी या बैठकीत केल्या.
तहसीलदार अर्चना यादव म्हणाल्या की, गाव निहाय झोन तयार करून समितीच्या सदस्यांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला जाईल. सदस्यांच्या माध्यमातून रेशनिंग केरोसीन वाटप यावर लक्ष ठेवले जाईल. तालुक्‍यात 188 रेशन धान्य दुकाने असून 216 केरोसिन वाटपाची दुकाने आहेत. त्यावर समितीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाईल. समितीच्या सदस्यांनी सुचवल्यानुसार दुकानात समितीच्या सदस्यांच्या नावाचा फलक लावण्यात येईल याबरोबरच दुकानात किती धन्य आले किती वाटप झाले शिल्क्क किती राहिले आदी माहितीचा फलक आणि त्याचे अपडेट लावण्यात येईल. येत्या 5 ऑक्‍टोबर 2018 रोजी रेशन दुकानदार, समितीचे सदस्य आशी एकत्रित बैठक घेतली जाईल. त्यात समितीच्या सदस्यांना ओळखपत्र देण्यात येतील. समितीकडून आलेल्या सूचनांचे पालन केले जाईल. तालुक्‍यातील गारगोटवाडी आणि कडाचीवाडी गारगोटवाडी या दोन गावांच्या ग्रामस्थांच्या रेशनिंग दुकानाबाबतच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या गावांना भेटी देऊन त्यांची चौकशी करून दुकानदारावर कारवाई करण्यात येईल.

  • गेल्या काही महिन्यापासून धान्य वाटप वेळेत केले जात असून त्यात पारदर्शकता आली आहे. ज्या व्यक्‍तींच्या हाताचे ठसे रेशनिंग वाटप मशीनवर जुळत नाहीत. त्यांची रेकॉर्ड तपासून व चौकशी करून त्यांना धन्य वाटप केले जात आहे.
    – राजेंद्र जाधव, नायब तहसीलदार
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)