तपास यंत्रणांनीच हात टेकले

  दाभोलकर पानसरे हत्या प्रकरण ; उच्च न्यायालयात दिली कबुली

मुंबई  – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी आम्ही हात टेकले, अशी स्पष्ट कबुलीच तपास यंत्रणांनी आज उच्च न्यायालयात दिली. हत्येचा तपास अशा टप्प्यावर आला आहे की त्या पुढे तपासाची कोणतीच दिशा आम्हाला सापडत नाही, असे सीबीआय आणि एसआयटी या दोन्ही तपास यंत्रणांनी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात मान्य केले.

-Ads-

तपासयंत्रणांच्या या भुमिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करून यापुढे आता गुन्हेगारांना कधीच पकडू शकणार नाही का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींप्रमाणे 20 ते 15 वर्षानंतर थकलेले म्हातारे झालेले आणि शरण आलेले आरोपी आपण पकडणार का असा सवालही न्यायालयाने केला. यापुढे आता फिल्ड वर्क करुन काही होईल अशी आशा नाही, जो काही तपास आहे तो शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून आणि पुरावे मिळवूनच होऊ शकेल, असे मत व्यक्त करून न्यायालयाने तसे निर्देश सीबीआय आणि एसआयटीला देत याचिकेची सुनावणी 28 जूनपर्यंत तहकूब ठेवली.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर आज न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)