तनुश्री दत्ता खोटे बोलते आहे

तनुश्री दत्ताने जेंव्हापासून नाना पाटेकरांवर घाणेरडे आरोप केले आहेत, तेंव्हापासून मिडीयामध्ये तिचीच जोरदार चर्चा रंगायला लागली आहे. 2008 मध्ये “हॉर्न ओके प्लीज’मधील “नथनी उतारो’ गाण्याच्या शुटिंगदरम्यान नानानी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता.

एवढेच नव्हे तर कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि डायरेक्‍टर सारंग बेशरमपणे हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत राहिले होते, असेही तनुश्रीने म्हटले होते. मात्र या दोघांनीही तनुश्रीचे आरोप सपशेलापणे फेटाळून लावले आहेत. तनुश्रीला पुन्हा हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे आहे, म्हणूनच ती असे वाद उकरून चर्चेत येण्याचा प्रयत्न करते आहे, असे डायरेक्‍टर राकेश सारंगनी म्हटले आहे.

ज्या गाण्याच्या दरम्यान नानाने विनयभंग केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता, त्या गाण्यात तिचा एकटीचाच डान्स असावा अशी तिची अपेक्षा होती. मात्र त्या गाण्यात एका पुरुषाचाही आवाज होता, हे तिच्या लक्षात नसावे. त्यामुळे या गाण्यात नानाचाही सहभाग असणार हे उघड होते, असे सारंगनी म्हटले आहे. नाना तर तनुश्रीला प्रोत्साहनच देत होते, त्यांच्या प्रोत्साहनाला तनुश्री चुकीचे समजली ही तिचीच चूक होती. तिने केलेले आरोप सपशेल खोटे आहेत, असेही सारंगनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)