तनुश्रीचे म्हणणे ऐकून घ्यावे वरूण धवन, स्वरा भास्कर यांचे समर्थन 

चित्रपटसृष्टीतील लोकांकडून व्यक्त होत आहेत व्यापक प्रतिक्रीया
 
मुंबई: दहा वर्षापुर्वी एका चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपला विचीत्र छळ केल्याचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या संबंधात आता चित्रपट सृष्टीतच दोन गट पडत चालल्याचे चित्र असून वरूण धवन आणि स्वरा भास्कर यांनी आज तिचे समर्थन केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की तिची नेमकी तक्रार काय आहे हे समजून घेतले पाहिजे. आपले तिला पुर्ण समर्थन आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
दहा वर्षांपुर्वी हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा जाहीर आरोप करीत तिने खळबळ उडवून दिली होती. या पार्श्‍वभूमीवर वरूण धवन यांनी म्हटले आहे की चित्रपटसृष्टीतील कामाचे ठिकाण हे सुरक्षित असले पाहिजे. त्यासाठी असल्या प्रकाराचा निषेध व्हायला हवा आहे. येथे प्रत्येकालाच योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे आणि महिला आणि मुलांसाठी येथील वातावरण सुरक्षित करण्याची गरज आहे.
चित्रपट सृष्टीतील अयोग्य घटनांच्या संबंधात कोणी आवाज उठवत असेल तर त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. तनूश्रीने अत्यंत धाडसाने आपल्यावरील प्रसंगाचे वर्णन केले आहे त्या धाडसाबद्दल आपण तिचे कौतुक करतो असेही वरूण धवन यांनी म्हटले आहे. जागरण चित्रपट महोत्सवात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. अनुराग कश्‍यप आणि सुधीर मिश्रा यांनीही चित्रपटसृष्टीत महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या गरजेवर भर देत तनुश्रीची पाठराखण केली आहे.
स्वरा भास्कर यांनी म्हटले आहे की कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हा गंभीर मामला असून त्याकडे आत्तापर्यंत कधीच गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. पण तनुश्री यांच्या सारख्यांकडून आता आवाज उठवला जात आहे ही एक चांगली बाब आहे असेही तिने म्हटले आहे. अभिनेते पंकज कपुर यांनी मात्र या वादात नेमके कोण बरोबर आणि कोण चूक याची चौकशी झाली पाहिजे असे विधान केले आहे. पुजा भट हिने म्हटले आहे की जर कोणी आपल्यावरील अन्यायाच्या बाबतीत आवाज उठवत असेल तर त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)