तनामनाची पवित्रता हे खरे धन : अभिनेते धर्मेंद्र

पिरंगुट- आईचे संस्कार आणि तनमनाची पवित्रता हे खरे माझे धन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांनी केले. भुकुम (ता. मुळशी) येथील देशी गायींचे संवर्धन करणा-या वृंदावन थारपरकर काऊ क्‍लब येथे तनमन पंचकर्म आणि आयुर्वेद क्‍लिनिकचे उद्घाटन आणि तनमन पुरस्काराचे वितरण अभिनेते धर्मेद्र यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. अविनाश ईनामदार, वृंदावन थारपरकर काऊ क्‍लबचे संस्थापक चंद्रकांत भरेकर, ग्रीन फार्मसीचे संचालक डॉ. अमोद साने, आंतरराष्ट्रीय आयुर्वेद ऍकॅडमीचे अध्यक्ष डॉ. सुभाष रानडे उपस्थित होते.
तनमनच्या उद्‌घाटनानिमित्त तनमन आयुर्वेद पुरस्काराचे वितरण करण्यात आले. दिवंगत वैद्य दादा खडिवाले यांना मरोणोत्तर तनमन जीवन गौरव पुरस्कार, आयुर्वेदाचे कार्य करणारे डॉ. दिलीप गाळगीळ यांना तनमन जीवन पुरस्कार, तर देशविदेशांत आर्युर्वेदाचा प्रसार करणाऱ्या डॉ. सुनंदा रानडे यांना प्रेरणा पुरस्काराने, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनिकेत आमटे यांना तनमन युवा पुरस्काराने गौरवित करण्यात आले.

  • मी पुणेकरच : धर्मेद्र
    तनमन पुरस्काराच्या निमित्ताने अनेक दिवसानंतर ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांचे पुण्यात आगमन झाले. यावेळी पुणेरी पगडी घालून त्याचे स्वागत करण्यात आले. मी मनाने पुणेकरच आहे असे सांगून काही काळ धर्मेद्र 1963 मधील आठवणीत रमले. ते म्हणाले की, प्रभात स्टुडिओमध्ये माझ्या एका गाण्याचे शूटिंग झाले होते. तेव्हाचे पुणे आणि आजचे पुणे खूप बदलले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)