तडीपार गुन्हेगार माळी गजाआड

राहुरी विद्यापीठ – राहुरी तालुक्‍यातील अट्टल गुन्हेगार व तडीपार असलेला किशोर साहेबराव माळी याला त्याच्या राहत्या घरी हत्यारासह पोलिसांनी गजाआड केले आहे.
माळी याला 1 मेपासुन 2 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तसेच त्याच्यावर मुलीचे अपहरण, चोरी, यासह आदि गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे पोलीस सुत्रांकडुन सांगण्यात आले. माळी त्याच्या घरी असल्याची माहिती पोलीस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली असता त्यांनी शुक्रवारी रात्री 11 दरम्यान पोलीस फौजफाटा घेत दुचाकीवर जावुन त्याला त्याच्या राहत्या घरी आतारमळा येथे जेरबंद केले. त्याला ताब्यात घेतले असता त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याच झडप घालुन पकडले. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
तिन्ही माळी बंधुला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असुन या बंधुवर मोक्का लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक रोहिदास पवार,पोलीस उपधिक्षक सोमनाथ वाघचौरे हे याबाबत काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)