सातारा,दि.8 (प्रतिनिधी)
तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुंडाला अटक झाली. अबिद अजिज सय्यद (वय , रा. जगदेश्वर कॉलनी,सैदापुर,सातारा) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.
सातारा शहर व तालुका परिसरात मटका,जुगार अड्डा चालवल्याप्रकरणी त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याला दि. मार्च रोजी सातारा तालुका पोलिसांनी सातारा,कोरेगाव,जावली,वाई,कराड या तालुक्‍यातून तडीपार केले होते. मात्र अजिज हा तडीपारी आदेशाचा भंग करुन सातारा शहर परिसरात फिरत असल्याची माहीती सातारा तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो.नि. प्रदीप जाधव यांच्या सुचनेनुसार अजिज याला ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता, जामिनावर सुटका करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)