तडीपार गुंडाला अटक

पिंपरी – खंडणी व दरोडा विरोधी पथकाने भोसरी येथून तडीपार आरोपीला अटक केली.

दाद्या उर्फ कृष्णा गणेश भोसले (वय-20, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना तडीपार दाद्या हा बालाजीनगर झोपडपट्टी येथे असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे खंडणी, दरोडा विरोधी पथकाने त्याला अटक केले. ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, किरण काटकर, सागर शेडगे यांच्या पथकाने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)