तडीपार आरोपीस कोयत्यासह अटक

पिंपरी – पिंपरी पोलिसांनी एका तडीपार आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे.

भुपेंद्र उर्फ सनी चरणजितसिंग गिल (वय-33, रा. गांधीनगर पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी याला पुणे उपायुक्त परिमंडळ तीन यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार केले आहे. तरीही तो पिंपरी-चिंचवड येथे कोयत्यासह आढळून आला. त्याला पिंपरी येथून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगणे तसेच नियम मोडून हद्दीत वावर केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)