तडीपार आरोपीसह सराईत जेरबंद

पिंपरी – पोलीस परिमंडळ एकच्या गुन्हे शाखेने केलेल्या दोन कारवाईत एका तडीपार आरोपीसह सराईत चोरट्याला अटक करून त्यांच्याकडून चोरीची सहा वाहने जप्त केली आहेत.

विकी दत्ता वाघमारे (वय-22, रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी, पुणे) व सागर सचिन सातपुते (वय-19, रा. विठ्ठलवाडी, सिंहगड रोड, पुणे) अशी दुचारी चोरांची तर पिंटू अनिरुद्ध जाधव (वय 27, रा. बालाजीनगर, भोसरी) असे तडीपारीची कारवाई झालेल्या आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी अमित गायकवाड आणि सावन राठोड यांना आरोपी वाघमारे याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक गणेश पाटील, स्वप्नील शिंदे, प्रमोद वेताळ, सुनील चौधरी यांनी पिंपरी येथे सापळा रचून वाघमारे याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. तसेच त्याने चोरलेल्या आणखी तीन दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केल्या.

दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस हवालदार अजय भोसले, सावन राठोड, निशांत काळे, शरीफ मुलाणी, विशाल भोईर, सागर शेडगे, गणेश कोकणे यांच्या पथकाने सागर सातपुते याला अटक केली. त्यांच्याकडून चोरीची दोन वाहने हस्तगत केली आहेत. तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असतानाच पोलिसांनी तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या पिंटू अनिरुद्ध जाधव (वय 27, रा. बालाजीनगर, भोसरी) याला अटक केली. तो शहरात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी सागर शेडगे यांना मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)