तडीपार आरोपीला अटक

पिंपरी – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तडीपार आरोपीला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.31) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस शिपाई करण नारायण विश्‍वासे यांनी फिर्याद दिली असून स्वप्नील उर्फ बाळु नामदेव शेलार (वय-26 रा. दत्तनगर, चिंचवड, सध्या अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील याला परिमंडळ तीन या परिक्षेत्रातून दीड वर्षासाठी 26 ऑक्‍टोबर 2017 पासून तडीपार करण्यात आले होते. तरीही तो शहर परिसरात असल्याची खबर मिळताच भोसरी एमआयडीसी पोलीसांनी त्याला अटक केले. स्वप्नील याच्यावर दरोडा, घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्यावर मुंबई पोलीस ऍक्‍ट 142 नुसार कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)