तडवळे येथे घर फोडून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास

कोरेगाव, दि. 24 (प्रतिनिधी)- तडवळे-सं. येथील बुवासाहबे जयसिंग कदम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात असलेला दोन लाख 95 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरल्याची फिर्याद कदम यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यातून फिर्यादीनुसार, रा. तडवळे, ता. कोरेगाव हे आपली पत्नी संध्या हिच्या बरोबर घरगुती कार्यक्रमासाठी अंधेरी (मुंबई) येथे गेले होते. त्या कार्यक्रम वरून मुलांच्या पुण्याच्या घरी आले होते. तिथे त्यांना बंधु सुभाष जयसिंग कदम यांचा घर फोडल्याचा फोन आला.
कदम तडवळे येथे घरी आले असता , त्यांना मुख्य दरवाजाच्या सेफ्टी डोअर व दरवाजाचे कडी- कोयंडे तुटलेले दिसले.तसेच बेडरुमची कडी -कोयंडे तुटलेले दिसले व बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला व कपाटातील लॉकरमधील 30 ग्रॅम वजन असलेले सोन्याचे गंठन, त्यामध्ये तीन पदरी सोन्याची चेन, चार सोन्याच्या बांगड्या, राणीहार, साखळीची डिझाइन असलेली चेन ब्रेसलेट, सोन्याची चेन, अंगठी व एक किलो 700 ग्रॅम वजनाची चांदीची वीट व 5000 हजार रुपयांची रोकड असा एकूण दोन लाख 95 रुपयांचा माल घेऊन पळाले असल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)