तडरगाव शाळेत विद्यार्थ्यांनी भरविला आठवडा बाजार

लोणंद, दि. 31 (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवाने घेता यावी या हेतूने प्रेरित होऊन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तरडगाव येथे आठवडा बाजार आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना चार दिवस अगोदर कल्पना देण्यात आली होती. बाजारात विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजीपाला कांदे,बटाटे, रांगोळी, पणत्या, पानीपुरी, भेळ, इत्यादी खाद्यपदार्थ, मेकअप साहित्य, प्लॅस्टिकची भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तू आणल्या होत्या.
विद्यार्थ्यांच्या आठवडी बाजारात सर्वात जास्त गर्दी पहायला मिळत होती ती म्हणजे खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर. सर्व ग्रामस्थांनी या बाजाराला भेट देऊन वस्तू विकत घेत विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिसाद दिला. दोन अडीच तासांच्या बाजारात 5541 रुपये एवढी विक्री विद्यार्थ्यांनी केली. पहिल्या स्वकमाईचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पालकवर्गाची आपल्या पाल्याकडून वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. तसेच या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांना असे व्यवहारिक ज्ञान आत्मसात करता आल्याने शाळेचे ही विशेष कौतुक होते आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रज्योत नाळे, सौ. उषा वाठारकर, सौ. प्रतिभा घाडगे, संजिवनी गायकवाड, सौ. सुलभा पाठक आणि सौ. शितल बुधनवर या शिक्षकांनी सहकार्य केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा गायकवाड, सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)