तक्षिला हायस्कूलने गाजविला उद्‌घाटनाचा दिवस

आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा; नरेंद्र फिरोदियांच्या हस्ते उद्‌घाटन

नगर – मॅक्‍सीमस स्पोर्टस्‌ ऍकॅडमी आणि शिवाजीयन्स्‌ स्पोर्टस्‌ क्‍लबच्या वतीने आयोजित तिसऱ्या फिरोदिया-शिवाजीयन्स्‌ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत तक्षिला हायस्कूल संघाने 12, 14 आणि 16 वर्षाखालील गटांमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा दिवस गाजवला.
अहमदनगर महाविद्यालय मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनचे मुख्य विश्‍वस्त नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवाजीयन्स्‌ स्पोर्टस्‌ क्‍लबचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, नगर फुटबॉल संघटनेचे गाडवीन डिक, प्रशिक्षक पल्लवी सैंदाणे, उपेंद्र गोलांडे आदी उपस्थित होते. 12 वर्षाखालील गटांत तक्षिला हायस्कूल संघाच्या मेहदी शेख आणि शानोवाज कर्चे यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर ऑक्‍झिलियम कॉव्हेन्ट हायस्कूल संघाचा 2-1 असा पराभव केला. 14 वर्षाखालील गटात जयराम मुथा याने केलेल्या हॅटट्रीक गोलाच्या जोरावर सेंट मिशेल स्कूल संघाने प्रियदशिर्नी पब्लिक स्कूलचा 6-0 असा धुव्वा उडविला.
स्पर्धेचा निकालः 12 वर्षाखालील मुलेः तक्षिला हायस्कूलः 2 (मेहदी शेख 7 मि., शानोवाज कर्चे 17 मि.) वि.वि. ऑक्‍झिलियम कॉव्हेन्ट हायस्कूलः 1 (सूरज केलानजिमनी 28 मि.);
आठरे पाटील पब्लिक स्कूलः 0 बरोबरी वि. प्रियदशिर्नी पब्लिक स्कूलः 0;
14 वर्षाखालील मुलेः तक्षिला हायस्कूलः 4 (पुष्कर नहार 4, 20 मि., विदीत अटल 8 मि., प्रथमेश दरंदले 39 मि.) वि.वि. ऑक्‍सिलियम कॉव्हेन्ट हायस्कूलः 0;
सेंट मिशेल स्कूलः 6 (जयराम मुथा 1, 5, 12, 32 मि., तनिष्क चलानी 28 मि., कृष्णा एम. 40 मि.) वि.वि. प्रियदशिर्नी पब्लिक स्कूलः 0;
16 वर्षाखालील मुलेः तक्षिला हायस्कूलः 2 (शिवतेज निंबाळकर 6 मि., तेजस जाधव 13 मि.) बरोबरी वि. ऑक्‍झिलियम कॉव्हेन्ट हायस्कूलः 2 (प्रतीक वाघचौरे 5 मि., सिद्धांत बोरूडे 37 मि.); सेंट मिशेल स्कूलः 7 (ऋषी बनकर 4, 8, 32 मि., राज कटारिया 5, 34 मि., मानस कर्डिले 6, 35 मि.) वि.वि. प्रियदशिर्नी पब्लिक स्कूलः 0;


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)