तक्रार करूनही विद्युत विभागाचा कानाडोळा

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील नांदुर येथील शेतकरी वीजवाहक तारांच्या झोळांमुळे पुरते वैतागले आहे. महावितरणला मात्र शेतकऱ्यांची किव येत नसल्याने शेतकऱ्यांना पुरतातरी कोणी वाली नसल्याचे दिसून येते. नांदुर गावच्या हद्दीतील वाळुंजस्थळ येथे अरूण शांताराम भालेराव यांची एक एकर क्षेत्र आहे. त्या क्षेत्रातून महावितरण विद्युत कंपनीची विद्युत वाहक तारा गेल्या आहे. तारा मनुष्याच्या हाताला लागेल अशा स्थितीत शेतामध्ये लटकलेल्या दिसत आहेत.

यासाठी सबंधित बाधित शेतकऱ्यांने महावितरणाकडे दोन वर्षांपासून सातत्याने अर्ज करून पाठपुरावा करूनही संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीला संबंधित विभागाचे अधिकारी दाद देताना दिसत नाही. विविध गावांतील वाड्यांवस्त्यांवर वीजवाहक तारांना सहजपणे मानवाचा स्पर्श होईल. अशा पद्धतीने तारांना झोळ पडलेला आहे. नांदुर येथील शेतकरी अरूण भालेराव यांच्या शेतातील तारांमुळे त्यांना शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्‍टर, बैलजोडी नेता येत नाही. या तारा हाताला लागून मोठी जीवितहानी भविष्यात होऊ शकते. या कारणाने त्यांना शेतात पाणी भरण्यास अडचण होत आहे.

तारांना झोळ असल्याने शेत बऱ्याच दिवसांपासून पडिक आहे.त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला शेतीपिके घेता येत नसल्याने त्यांचे बरेच आर्थिक नुकसान महावितरणच्या भोंगळ आणि गलथान कारभारामुळे होत असल्याचा आरोप उपसरंपच स्वप्नील जाधव यांनी केला आहे. संबंधित शेतकरी दलित कुटुंबातील असून त्यांना जाणुनबुजून त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी बांधवांचा आहे. महावितरणचे घोडेगावचे अधिकारी या शेतकऱ्यांला नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देऊन काम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)