तक्रारीसाठी वापरा “सतर्क पुणेकर’ अॅप

वाहतूक पोलिसांचे नागरिकांनो आवाहन

पुणे – वाहतूक पोलिसांनी यापूर्वी “सतर्क पुणेकर’ अॅप सुरू केले आहे. याचा वापर करुन तक्रार केल्यास नाव, तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती मिळते. यामुळे तात्काळ मदत करणे शक्‍य होणार असल्याने, जास्तीत जास्त नागरिकांनी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

-Ads-

ट्‌वीटर, फेसबुक, व्हॉट्‌स अॅप वापराच्या माध्यमातून वाहतूक पोलीस दिवसेंदिवस टेक्‍नोसॅव्ही होत असून ऑनलाइन तक्रारी सोडविण्यावर भर दिला जात आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नवनवीन प्रयोग केले जात आहे. नो ट्रॅफिक रूल व्हायोलेशन झोन, नो पार्किंग झोन, मार्गबदल करुन वाहतुकीला शिस्त लावली जात आहे. यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांकडून अनेकदा व्टीटरद्वारे तक्रार करत फोटो पाठवितात. मात्र, तो कधीचा आहे याबाबत ठोस माहिती मिळत नाही. व्हॉट्‌स अॅपबाबतही हीच परिस्थिती असल्याने यामुळे कार्यवाही करण्यास मर्यादा येतात. या पार्श्‍वभूमीवर काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या “सतर्क पुणेकर’ अॅपचा नागरिकांनी वापर केल्यास कारवाई करणे सोपे जाणार आहे. या अॅपच्या माध्यमातून तक्रारदाराचे नाव, पाठवलेल्या फोटोची वेळ, ठिकाण आणि तारीखही समजते. वाहतूक पोलिसांना यामुळे माहिती समजणे सोपे जाऊन कारवाई करता येते. या अॅपच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणे सुलभ जाते, यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

ही माहिती समजणार


 तक्रारदाराचे नाव, दिनांक आणि ठिकाण
वाहतूक नियम तोडणाऱ्याचा फोटो पाठवल्यास त्याची वेळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)