तक्रारदारांची “दांडी’ रोखण्याचे ग्राहक मंचात आव्हान

– विजयकुमार कुलकर्णी

पुणे – ग्राहक मंचात तक्रारदार गैरहजर राहण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तक्रारदार गैरहजर राहत असल्यामुळे प्रलंबित खटले ग्राहक मंचाकडून निकालात काढण्यात येत आहेत. मे ते जुलैदरम्यान ग्राहक मंचात एकूण 84 खटले निकली काढण्यात आले. त्यापैकी 44 खटल्यांत तक्रारदार हजर नव्हते. एकंदरीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये निम्म्याहून अधिक प्रकरणे तक्रारदार हजर न राहिल्याने आहेत. हा विषय चिंतेचा बनला आहे. यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.

-Ads-

ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि झाल्यास त्वरित न्याय मिळण्यासाठी सन 1985 मध्ये राज्यात ग्राहक मंच सुरू करण्यात आले. त्यानुसार पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाची येथे स्थापना करण्यात आली. वस्तुस्थिती लक्षात घेऊन फसवणूक प्रकरणात ग्राहकांना मोबदला, त्यावरचे व्याज मिळवून दिले जाते. त्याचबरोबर मानसिक, शारीरिक त्रास, तक्रार अर्जाचा खर्चही ग्राहकाला मिळवून दिला जातो.

अलिकडच्या काळात ग्राहक हक्‍कांबाबत जागृत होत आहे. फसवणूक झाल्यास तो ग्राहक मंचात दाद मागततो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बिल्डर, मोबाइल हॅंडसेट कंपन्या, विमा कंपन्याविरोधात मंचात दाखल प्रकरणांची संख्या लक्षणीय आहे. इतर कारणांसाठी फसवणुकीची प्रकरणे येत आहेत. अनेक न्यायालयांमध्ये जाब देणारा हजर राहत नसतो. मात्र, ग्राहक न्यायालयात उलटे होताना दिसत आहे. येथे तक्रारदारच दांडी मारताना दिसत आहेत. दोन ते तीन वर्षे झाले तरी तक्रारदार हजरच राहत नाहीत, असे खटले ग्राहक मंच निकालात काढत आहेत. खटला दाखल केल्यानंतर काही कालावधीत सबळ पुरावा नसल्याचे तक्रारदारांच्या लक्षात येते. त्यामुळे ते गैरहजर राहतात. तर तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदार आणि ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, त्या जाब देणाऱ्यांमध्ये आणि तक्रारदारांमध्ये “समझोता’ होतो. मात्र, याबाबतची माहिती पक्षकार मंचात देत नाहीत. त्यामुळे तक्रारदार, जाबदेणार दोघेही गैरहजर राहतात. तर काही प्रकरणांमध्ये कौटुंबीक कारणांमुळे तक्रारदार हजर राहू शकत नाहीत. सुनावणीसाठी लागणाऱ्या कालावधीमुळे तक्रारदार हजर राहण्याचे टाळतात. तर विषयाची आर्थिक किंमत आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेचा विचार करून काही तक्रारदार हजर राहण्याचे टाळतात. यावर मार्ग निघणे गरजेचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)