तक्ररवाडीतील मच्छिबाजार भिगवणला हलवणार?

भिगवण – तक्रारवाडी येथील मच्छीबाजार भिगवण येथे हलवण्यास मच्छी व्यापाऱ्यांचा जोरदार विरोध होत असल्याचे मच्छी व्यापाऱ्यांनी घेतेलेल्या पत्रकार परिषदेत आज सिद्ध झाले आहे.

इंदापूर येथील मच्छी बाजाररात नवीन काटा सुरु करण्यास परवानगी दिली जात नाही आणि भिगवण मच्छी बाजार मात्र काट्यासाठी जागा उपलब्ध नसतानाही पाचवा काटा सुरु करण्याची परवानगी कशी काय देण्यात आली? इंदापूर मच्छी बाजारात एक न्याय अन्‌ भिगवण मच्छी बाजारात वेगळा न्याय का असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी व्यापाऱ्यांनी एक महत्त्वाची मागणी केली की, इतर जिल्हा तालुक्‍यातील मच्छी बाजार हे स्वतंत्र आहेत मात्र, इंदापूर तालुक्‍यातील दोन बाजार हे बाजार समितीकडे का? इंदापूर बाजार समिती आम्हा व्यापाऱ्यांकडून प्रती 1 रुपया किलो सेस घेते.

-Ads-

त्याप्रमाणे बाजार समिती कसल्याही सुविधा देत नाही या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, पिण्याचे पाण्याची सोय नाही. मात्र धाकट शाहिने वसुली केली जाते, या सर्व गोष्टी इंदापूर बाजार समिती वेळोवेळी सांगितल्या आहेत. तरी ही योग्य सुविधा मिळत नसल्याने येथील काही मच्छी व्यापाऱ्यांनी सेस भरणे बंद केले आहे, तर काही व्यापारी बुधवारपासून बाजार समितीचा सेस भरणार नाही असा निर्णय सर्व व्यापाऱ्यांनी यावेळी घेतला आहे. तसेच बुधवारी इंदापूर बाजार समिती बैठक घेणार असून मच्छी बाजार स्थलांतर रद्द करणे व इतर मागण्या पूर्ण करावेत या मागण्या करण्यात येणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले
चौकट : राजकीय आकस?
तक्रारवाडी ग्रामपंचायत ही कॉंग्रेसचे ताब्यात आहे. आणि इंदापूर बाजार समिती ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असल्याने राजकीय आकसातून हा मच्छी बाजार भिगवण येथे नेण्याचा घाट घातल्याची चर्चेने परिसरात जोर धरला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)