तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळा

  • पोलीस उपायुक्‍त शिंदे ः जागतीक मौखिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम

पिंपरी, (प्रतिनिधी)- पोलीस दलात कामाची धावपळ अधिक आहे. त्यामुळे पोलीस तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करतात. यातून पुढे अनेक आजार होण्याची शक्‍यता असते. पोलिसांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. मौखिक आजारांची भीषणता पाहता सर्वांनीच मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. देशात दरवर्षी आठ लाखांहून अधिक तंबाखुजन्य पदार्थांचे सेवनाने मृत्यू होत आहे.

तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळल्यास आजारांपासून लांब राहता येईल, असे परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी मत व्यक्‍त केले. इंडियन डेन्टल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड शाखेने जागतीक मौखिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये मौखिक आरोग्य तपासणी, आरोग्य निरीक्षक, पोलीस, शिक्षक, अंध व विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, उत्कृष्ट कार्य केलेल्या दंत वैद्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस उपायुक्‍त शिंदे यांनी उद्‌घाटन केले.

यावेळी पीएनजी ऍण्ड सन्सच्या संचालिका रेणू गाडगीळ, नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे, वायसीएम रुग्णालय दंत विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, एमडीएचे उपाध्यक्ष डॉ. राकेश प्रसाद, आयडीएचे शहराध्यक्ष डॉ. विकास बेंदगुडे, सचिव डॉ. मनिषा गरुड, खजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. संदीप भिरूड, तंबाखू नियंत्रण कायद्याच्या पुणे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ. युसुफ चुनावाला उपस्थित होते.

रेणू गाडगीळ म्हणाल्या की, समाजामध्ये मौखिक आरोग्यावर फारसे बोलले जात नाही. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे मोठे कार्य पिंपरी चिंचवड डेन्टल असोसिएशन करत आहे. डॉ. यशवंत इंगळे यांचे कर्करोग विषयी जनजागृतीपर व्याख्यान झाले.
डॉ. विकास बेंदगुडे म्हणाले, समाजामध्ये आपण राहतो, आपल्याला पत-प्रतिष्ठा प्राप्त होते, त्या समाजाचे काही प्रमाणात ऋण फेडण्याचा प्रयत्न दंत वैद्य आणि डेन्टल असोसिएशन करीत आहे.

डॉ. मनिषा गरुड यांनी 2022 पर्यंत पिंपरी चिंचवड शहर तंबाखुमुक्‍त करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. यावेळी वूमन्स ऍवॉर्ड – 2018 चे वितरण करण्यात आले. डॉ. मंजुषा इंगळे, डॉ. माया दलाया, डॉ. माधवी म्हापुसकर, डॉ. सुप्रिया खेऊर, डॉ. विता काबरा, डॉ. दिपाली पाटेकर, डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ. मोना दिवाण, डॉ. मिनल सपाटे, डॉ. प्रतिभा भोसले, डॉ. श्रुती कुलकर्णी, डॉ. जुबी अब्राहम, डॉ. अनुजा कृष्णा, डॉ. सुजाता पिंगळे, डॉ. मनिषा सुकाळे, डॉ. मनिषा गरुड, डॉ. सपना अगरवाल, डॉ. मरियुम, डॉ. ख्याती गिडवानी, डॉ. सुज्ञा कुलकर्णी, डॉ. प्रांजल वाघ, डॉ. समज्ञा ढवळेश्वर, डॉ. ऐश्वर्या लोहकरे, डॉ. मिनाक्षी घोळकर, डॉ. संयुक्‍ता खैरनार-रॉय, डॉ. सोनिया रोहरा, डॉ. स्वप्ना निकाजू यांचा गौरव करण्यात आला. डॉ. मिलिंद फाटक यांनी प्रास्ताविक, डॉ. मनिषा गांगुर्डे, डॉ. संयुक्‍ता खैरनार यांनी सूत्रसंचालन व डॉ. मनिषा गरुड यांनी आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)