तंबाखुमुक्‍तीची शपथ

टाकळी हाजी-शिरूर तालुक्‍याच्या बेट भागात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरखेड, जांबुत वडनेर, फाकटे, चांडोह, काठापुर टाकळीहाजी, कवठे यमाई, सविंदणे आदी गावातील ग्रामपंचायत व शाळेत विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड येथे शाळेत व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद बोंबे यांनी ध्वजारोहण केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत, देशभक्ती गीत व सांस्कृतिक कार्यक्रम करत ग्रामस्थांनी मने जिंकली व तंबाखुमुक्तीची शपथ घेण्यात आल्याचे मुख्याध्यापक पी. सी. बारहाते यांनी सांगितले. पिंपरखेड येथे सरपंच मंदा बोंबे यांचे हस्ते ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले. टाकळी हाजी येथे सरपंच दामू घोडे यांनी तर बापूसाहेब गावडे विद्यालयात माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ध्वजारोहण केल्याचे प्राचार्य आर. बी. गावडे यांनी सांगितले. जय मल्हार हायस्कूल जांबूत आदर्श स्कूल जांबूत तसेच बेट भागातील सर्वच जिल्हा परीषद शाळा तसेच सर्व गावातील ग्रामपंचायतमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

  • ग्रामसभांमध्ये महत्त्वाचे निर्णय
    प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध गावात ग्रामसभा घेण्यात आल्या. वडनेर खुर्द या ठिकाणी गावपातळीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लग्नाच्या वरातीमध्ये डी. जे. वाजवण्यासाठी संपूर्ण बंदी तसेच सार्वजनिक ठिकाणी व वरातीत दारू पिणाऱ्या व्यक्तीवर शिक्षा म्हणून दंड आकारण्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते चिमाजी निचित यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)