तंत्रात बदल करण्याची गरज जाणवत नाही : मुरली विजय 

चेन्नई: भारताचा सध्याचा सर्वोत्तम तांत्रीक फलंदाज असलेला मुरली विजयने वेस्ट इंडीज दौऱ्यात सहभागी न झाल्यानंतर नाराज न होता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत असताना सांगितले की, इंग्लंडमध्ये अपयशी ठरल्यानंतर सर्वांनी मला माझ्या फलंदाजीच्या शैलीत बदल करण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, मला नाही वाटत की, मला माझ्या तंत्रात बदल करण्याची गरज आहे.

यावेळी बोलताना विजय म्हणाला की, इंग्लंड दौऱ्यात पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर मी माझ्या तंत्राच्या आधारे तेथिल स्थानिक काऊंटी क्रिकेट मध्ये फलंदाजी करताना तितक्‍याच प्रभावी पणे फलंदाजी करत खोऱ्याने धावा केल्या होत्या. माला भारतीय संघात पुनरागमन करायचे होते म्हणून मी काऊंटी क्रिकेट खेळलो असे सर्वांना वाटते आहे. मात्र, तसे नसून मी पुन्हा एकदा लईत येण्यासाठी फलंदाजीच्या तंत्रात सुधारणा करण्यासाठी काऊंटी क्रिकेट खेळलो हेही तितकेच खरे आहे.

2014-15च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मुरली विजयने चांगली कामगिरी करताना आपली छाप पाडली होती. आता पुन्हा एकदा तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात निवडला गेला असून याही वेळी त्याच्या कडून पुन्हा एकदा तश्‍याच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. त्या संदर्भात बोलताना तो म्हणाला की, यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीला आम्हाला सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला तेथिल वातावरणात जुळवून घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच संघात पुनरागमन करून संघाच्या विजयात हातभार लावणे हे खुप महत्वपूर्न असते. आणि त्यासाठी आता मी उत्तम तयारी केली आहे. तसेच या दौऱ्यात संघातील सर्वच खेळाडू उत्तम कामगिरी करतील यची मला आशा आहे असेही त्याने यावेळी सांगितले.

तो म्हणाला की, नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात मी भारत-अ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळपट्टया तसेच वातावरण सारखेच असल्यामुळे या दौऱ्याचा मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फायदा होईल याची मला खात्री आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मी चांगली तयारी केली आहे. यादौऱ्यात मी तेथिल खेळपट्टीच्या परिस्थितीनुसार कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

गेल्या वर्षी झालेल्या मनगटाच्या दुखापतीनंतर मुरली विजयचे संघातील स्थान धोक्‍यात आले होते. त्यातच त्याने इंग्लंड दौऱ्यात केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याच्या संघातील सहभागा बद्दल शंका उपस्थित केली जात होती. मात्र त्यानंतर त्याने काऊंटी क्रिकेट मध्ये आणि भारत अ संघाकडून चांगली फलंदाजी करत संघात स्थान पुन्हा मिळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)