तंत्रशिक्षण महाविद्यालयांवर देखरेखीसाठी “एनबीए’ पोर्टल

विद्यार्थ्यांनीच केली निर्मिती : एका क्‍लिकवर मिळणार माहिती

पुणे – तंत्रशिक्षण संचलनालयाच्या अखत्यारितील दीड हजार महाविद्यालयांवर देखरेख करणे आता अधिक सोयीचे ठरणार आहे. संचलनालयातर्फे विकसित करण्यात आलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडेशन (एनबीए) पोर्टलवर लवकरच या सर्व महाविद्यालयांची एकत्रित आणि अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे.

तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे रविवारी आयोजित एका कार्यक्रमात तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी संचलनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ उपस्थित होते. याबाबत माहिती देताना डॉ. वाघ म्हणाले,”तंत्रशिक्षण संचलनालयाच्या नियमावलींची, अटींची पूर्तता करणाऱ्या संस्थांना संचलनालयातर्फे मान्यता देण्यात येते. मात्र, त्या नियमावलींची पूर्तता करण्यामध्ये सातत्य आवश्‍यक आहे. परंतु अनेकदा काही महाविद्यालयांकडून या अटींची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे ही महाविद्यालयांवर कारवाई होणे आवश्‍यक असते. मात्र, अशी नेमकी किती आणि कोणती महाविद्यालये आहेत, याबाबतची एकत्रित माहिती आतापर्यंत उपलब्ध नव्हती. यासाठी संचलनालयातर्फे हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. लवकरच सर्व महाविद्यालयांना या पोर्टलशी जोडून त्यांच्या कार्यावर देखरेख केले जाईल. इतकेच नव्हे, तर महाविद्यालयांना त्यांच्या कार्यात्नक विकास करण्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा अभ्यास करणेही शक्‍य होणार आहे.’

विशेष म्हणजे, हे संकेतस्थळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीच विकसित केले आहे. ठाणे येथील ए.पी.शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे विद्यार्थी असणारे राकेश कामरा आणि शुभम मिश्रा यांनी हे संकेतस्थळ विकसित केले असून, ते संचनालयाला स्वेच्छेने वापरण्यासाठी दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)