तंत्रज्ञान वापरातूनच वाहतूक समस्येवर तोडगा – गडकरी

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग – 4 वरील चांदणी चौकातील उड्डाणपूल आणि सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. सध्या साडेबारा हजार कोटी रुपयांचा कामाचे डीपीआर तयार आहे. जागा ताब्यात आल्यावर येत्या डिसेंबरअखेर ही सर्व कामे सुरू होतील. तसेच 5 हजार कोटी रूपयांची कामे सुरू आहेत. तर साडेबारा हजार कोटी रूपयांची कामे अजून करायची असल्याचे गडकरी यांनी सांगितले. माझ्याकडे पैशाला कमी नाही. पैसा भरपूर आहे. मात्र, अधिकाऱ्यांना वेळेवर काम करण्याची सवय नाही. त्यामुळे दांडा घेऊन त्यांच्यामागे सारखे लागावे लागते. देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. त्यामध्ये दीड लाख नागरिक मृत्युमुखी पडतात, तर तीन लाख लोक जखमी होतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाढतच नव्हता. रस्ते, महामार्ग आणि जहाज वाहतूक विभाग माझ्याकडे आल्यानंतर महाराष्ट्रात 5 हजार किलोमीटरचा महामार्ग आता 22 हजार किलोमीटरचा झाला आहे. तर देशात 96 हजार किलोमीटरचा महामार्ग 2 लाख किलोमीटरचा झाला आहे.

वाहनांची वाढती संख्या पाहता, आता रस्ता रूंदीकरण अशक्‍य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या टेक्‍नोलॉजीकडे आपण वळलो पाहिजे. जलवाहतुकीला पहिले प्राधान्य असावे. आपल्याला साडेसात हजार किलोमीटरचा समुद्र किनारा आणि 20 हजार किलोमीटरचा जलमार्ग आहे. दुसरे प्राधान्य रेल्वे आणि त्यानंतर रस्ते वाहतुकीला द्यावे. त्यासाठी सर्वांनी ठरवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल. जलवाहतूक केली, तर 20 पैसे खर्च आहे. रेल्वेने गेलो, तर 1 रुपया आणि रस्तेमार्गाने गेलो तर दीड रुपया खर्च आहे. त्यामुळे जलप्रवास केला पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

पुणे-सातारा महामार्गाचे लवकरच रूंदीकरण
पुणे-सातारा महामार्गावरील 59 किलोमीटर रस्त्याच्या कामात ठेकेदार, जागा या अडचणी आहेत. त्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यांनी यामध्ये लक्ष घालून अडचणी सोडवाव्यात. येत्या सहा महिन्यांत या सर्व अडचणी सोडवून महामार्ग पूर्ण करेल, असा विश्‍वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. खंबाटकी घाटातून सातारकडून पुण्याकडे येणारा बोगदा मोठा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करून सहा लेनचा नवीन बोगद्याचे काम येत्या सहा महिन्यांत सुरवात होईल. त्यामुळे साडेसोळामध्ये एक हजार कोटी वाढणार असून साडेसतरा हजार कोटी रुपयांची ही कामे होणार आहेत. तसेच 13 रेल्वे ओव्हरब्रीजला मान्यता देण्यात आली आहे. शिवाय दोन ड्रायपोर्ट, मुळा-मुठा नदी प्रोजेक्‍ट समोर आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)