तंटामुक्ती अध्यक्षपदी सतीश आवचर

देऊळगावरजे- देऊळगावराजे येथील तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी सतीश आवचर, तर बाजार समितीच्या अध्यक्षपदी लालासाहेब गिरमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड देऊळगावराजे (ता. दौंड) चे सरपंच प्रभावती पोळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या दोन्ही नवार्चित अध्यक्षांचे भाजपचे राज्याचे सरचिटणीस वासुदेव काळे यांनी अभिनंदन केले. यावेळी भीमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम आवचर, अभिमन्यू गिरमकर, सचिन गिरमकर, धानेश्वर आवचर, जनार्दन आवचर, अनिल गिरमकर, राजेंद्र बुराडे, गणेश आवचर, ग्रामपंचायत सदस्य पंकज बुराडे, हरी आवचर, ग्रामसेवक मच्छिंद्र निगडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)