तंग कपड्यांमधील भाविकांना अंबाबाई मंदिरात मज्जाव

देवस्थानच्या 3 हजारांवर मंदिरासाठीही हा निर्णय लागू


पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय

कोल्हापूर – करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात भक्तांना यापुढे भारतीय पद्धतीच्या पूर्ण पोशाखात मंदिर प्रवेश दिला जाणार आहे. शॉर्ट, थ्री फोर्थ सारखे तोकड्या पोशाखात मंदिरात गेलात तर आत येण्यास मज्जाव केला जाणार आहे. हा निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. विशेष म्हणजे, देवस्थान समितीच्या तीन हजारांवर मंदिरातही अशीच प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच, अशिष्ट स्थितीमध्ये राहून मोबाईलवरून छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला तरीही मंदिरातून बाहेर काढले जाणार आहे.

आगामी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात नियोज़नाला गती आली आहे. मंदिराची स्वच्छता करण्याचे कामही आजच सुरु झाले. यंदा हा उत्सव निटनटकेपणाने पार पडावा यासाठी आज देवस्थान समितीच्या कार्यालयात समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये काही वेगळे, धाडशी निर्णय घेण्यात आले.

-Ads-

महालक्ष्मी मंदिरात देश-विदेशातून भाविक येत असतात. मात्र त्यातील काहीजण आधुनिक वेशात येतात. त्यांचा वेश आक्षेपार्ह्य असल्याची पत्रे देवस्थान समितीकडे आली आहेत. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य राहत नाही, असाही तक्रार करणाऱ्या भाविकांचा सूर आहे. ही बाब लक्षात घेऊन यापुढे मंदिर प्रवेश करताना भारतीय पद्धतीच्या पूर्ण पोशाख असावा याची दक्षता घ्यावी. शॉर्ट, थ्री फोर्थ सारखे तोकडे कपडे परिधान केल्यास मंदिरातून बाहेर काढले जाणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीने स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे, असे देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मंदिरात आल्यानंतर भाविकांना छायाचित्रे काढण्याची हौस असते. पण, अनेकजण अशिष्ट स्थितीमध्ये उभे राहून मोबाईलवरून छायाचित्रे काढतात. सभ्येतेच्या मर्यादा ओलांडली जाणारी ही पद्धत बंद केली जाणार असून अशाप्रकारे छायाचित्रे काढण्यासही मज्जाव केला आहे, असेही जाधव म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)