ढोल वादनाने नागरी समस्यांकडे लक्ष वेधले

नेहरूनगर : समता सैनिक दलाचे निवेदन स्वीकारताना क-प्रभाग अधिकारी.

समता सैनिक दलाचा उपक्रम

पिंपरी – शहरातील उच्चभ्रू भागात शेअर ए बायसिकल योजना राबवत असताना नागरिकांना पुरेशा प्रमाणात नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ नेहरूनगर येथील क-प्रभाग क्षेत्रिय कार्यालयात “व्यवस्थेवर ठोका’ या मोहिमअंतर्गत समता ढोल पथकाने ढोल वाजवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

क-प्रभागातील गांधीनगर, विठ्ठलनगर, बालाजीनगर, खराळवाडी, गवळीमाथा, खंडेवस्ती भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. काही दिवसांपूर्वीच्या जोरदार पावसामुळे गांधीनगर परिसरात दोन दिवस पाण्याचा निचरा होऊ शकला नव्हता. याबाबत महापालिका आयुक्‍तांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला होता. याशिवाय नागरी सुविधांच्या कमतरतेमुळे अस्वच्छ बाथरूम, कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे, रस्तींवरील खड्डे अशा अनेक अडचणींना प्रभागात नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. नागरी प्रश्‍न सोडवण्यासाठी व्यवस्थेवर ठोका आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी क-क्षेत्रीय कार्यालयात ढोल वाजवून नागरी सुविधा, स्वच्छ पाणी, साफ-सफाई, चांगले रस्ते, स्वच्छता गृह दुरुस्ती, औषध फवारणी, ड्रेनेज लाईन या मागणीच्या घोषणा देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. क-प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रदीप मुथा, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता शशिकांत दवंडे यांना समता सैनिक दलाने यावेळी निवेदन दिले. अधिकाऱ्यांनी सर्व समस्या सोडवण्याचे आश्‍वासन समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दिनेश वाघमारे, उमेश सूर्यगंध, आशुतोष कांबळे, अजय पालके, पायल ओव्हाळ व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)