ढोल-ताशा पथकांची परदेशांतही गर्जना

तरुणांचा उदंड उत्साह : बाप्पांच्या आगमनानिमित्त सरावाला वेग

पुणे – लाडक्‍या गणपती बाप्पांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यासाठी ढोल-ताशा पथकांचा सराव जोरात सुरू आहे. अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे सरावाला वेग आला असून, नदीपात्र परिसर ढोल-ताशाच्या आवाजाने दणाणला आहे. तर, सरावादरम्यान नवनवीन ठेके ऐकायला मिळत आहेत. यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पथकांची संख्या यंदा वाढली आहे. दरम्यान, पुण्याच्या “ढोल-ताशा संस्कृती’ची गर्जना आता देशासह परदेशांतही पसरत आहे.

सध्या डी.जे.च्या गाण्यांवर थिरकणारी तरुणाई ढोल-ताशा पथकांकडे वळत आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि ढोल-ताशा पथकांचे वादन हे समीकरण ठरलेले आहे. शहरात 120 पथकांची अधिकृत नोंदणी असून, 20 ते 25 पथके नोंदणी नसलेली आहेत. विशिष्ट पेहराव, लयबद्ध वादन, नवनवीन ठेके, शिस्तबद्धपणा आणि पथकासमोर हातात भगवा झेंडा यासह संबळ, शंख, टोल या वाद्यांचा समावेश हे पथकांचे वैशिष्ट्ये आहे. वादन पाहण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी होते आणि या पथकांमुळे गणेशोत्सवामध्येही संस्कृतीचे दर्शन होत आहे.

ढोल-ताशा पथकाची संस्कृती पूर्वीपासून आपल्याकडे आहे. परंतू, गणेशोत्सवात ही संस्कृती मागील काही वर्षांपासून आली आहे. सुरूवातील काही ठराविक पथकेच गणेशोत्सव, नवरात्रीत वादन करत होते. परंतू, कालांतराने पथकांची संख्या वाढत गेली आणि आज ही संख्या शंभरावर गेली आहेत. मुठा नदीपात्रात ढोल-ताशा वाजायला लागले की गणेशोत्सवाची चाहूल लागते. पथकाकडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या एक ते दीड महिना आधी सराव सुरू होतो. मात्र, पावसामुळे सरावाला यावर्षी उशीर झाला.

यंदा नदीपात्रामध्ये सर्वाधिक प्रमाणात पथके सराव करत आहे. पोलिसांनी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत सरावाला परवानगी दिली आहे. तसेच 30 ढोल आणि 5 ताशांना परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच पथके सायंकाळी सराव करतात. त्यामुळे आता सरावाचा वेग वाढत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच पथकांमध्ये वादन करतात. परंतु, नेहमीप्रमाणे तरुणांची संख्या मोठी असून आयटी कर्मचाऱ्यांचाही सहभाग मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक पथकाच्या सरावामध्ये उदंड उत्साह दिसून येतो.

मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्याने येत असल्याने दरवर्षी ढोल ताशा पथकेही मोठ्या संख्येने या रस्त्यावर पाहायला मिळतात. मात्र, पथकांची वाढती संख्या आणि उपनगरांमधील मंडळेही पथकांसाठी आग्रही असल्याने यंदा उपनगरांमध्ये पथकांचे वादन होणार आहे. तसेच यावर्षीही गणेशोत्सवात नावीन्यपूर्ण वादन ऐकायला मिळणार आहे. एका पथकात 50 ते 60 ढोल आणि 10 ते 20 ताशे असावेत. या प्रकारे पथकीतल वाद्यांची संख्या असेल तरच उत्साहपूर्ण वादन करता येते आणि नागरिकांचीही तीच अपेक्षा असते. लक्ष्मी रस्त्यावरील गर्दीमध्ये नागरिक आणि पथकातील वादकांची हुज्जत होते. त्यामुळे यावर्षी लक्ष्मी रस्त्यावर वादकांच्या 5 ऐवजी तीन रांगा करण्यात येणार आहेत.
– पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा पथक.


शहरात मागील दोन वर्षांत पथकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पथकांचे एकूणच अर्थकारण हे काटोकोर पद्धतीने चालविले जाते. शहरातील काही पथकांना नदीपात्रात सरावासाठी जागा उपलब्ध आहे. परंतु, उपनगरांमध्ये काही पथकांना जागा उपलब्ध नसते. त्यामुळे सरावासाठी जागेपासून सर्व गोष्टी पाहव्या लागतात. गणेशोत्सवात जे मानधन मिळते, त्यामध्ये सर्व खर्च जावून उरलेली रक्कम विविध सामाजिक कार्यासाठी खर्च केली जाते. त्यामध्ये अनाथांना शिक्षणासाठी दत्तक घेणे, आदिवासी भागातील कुटुंबांची दिवाळी गोड करणे, नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी मदत यासह अंध, दिव्यांग मुले, नागरिकांना मदतीचा हात देऊन एक छोटीशी सेवा केली जात आहे.
– उमेश भेलके, एकदंत वाद्य पथक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)