ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती उत्साहात

शिरूर- ढोल ताशांच्या दणक्‍यात, जय भवानी-जय शिवाजी जयघोषात, अभिवादन करून शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष वैशाली वाखारे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, शिवसेना नेते प्रभाकर डेरे, शिवसेना तालुका संघटक कैलास भोसले, शहर संघटक राजेंद्र शिंदे, माजी शहरप्रमुख बलराज मल्लाव, युवासेना शहर अधिकारी सुनील जाधव, महिला जिल्हा उपसंघटक विजया टेमगिरे, नगरसेवक मंगेश खांडरे, दादाभाऊ वाखारे, रवींद्र सानप, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, बाबुराव पाचंगे, योगेश ओव्हाळ, गणेश जामदार, दादापाटील घावटे, विठ्ठल घावटे, मुश्‍ताक शेख, अनिल बांडे , सुनील जठार व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक , नागरिक उपस्थित होते. यावेळी शहर परिसरात भगवे झेंडे, भगव्या पताका, भगव्या कमानी लावून वातावरण शिवसेनामय केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)