ढोलपुरला राहुल गांधींचा रोड शो ; मोदींच्या आर्थिक धोरणांवर केला कडाडून हल्ला

ढोलपुर: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राजस्थानातील ढोलपुर परिसरात रोड शो करून पक्षासाठी प्रचार केला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की मोदींनी गाजावाजा करीत मेक ईन इंडिया मोहीम सुरू केली पण तिचा फज्जा उडाला. देशातील अनेक कारखाने बंद पडले असून आता फोन बरोबरच टीशर्टचे उत्पादनही चीनकडून केले जाते.

त्यांनी या रोड शो द्वारे पुर्व राजस्थानातील दीडशे किमी परिसरातील लोकांशी संपर्क प्रस्थापित केला. ठिकठिकाणच्या सभेत बोलताना ते म्हणाले की लोकांनी मोदींवर विश्‍वास ठेवला. मी चौकीदार म्हणून लोकांसाठी काम करीन असे मोदी म्हणाले होते. पण मोदींची जुनी भाषणे ऐकून लोकांना आता हसु येऊ लागले आहे. आपण नेमके कोणासाठी चौकीदार म्हणून काम करणार हे मोदींनी सांगितले नव्हते आता ते अनिल अंबानीसारख्या उद्योगपतींसाठी चौकीदाराचे काम करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला. देशातल्या काही मोजक्‍याच उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करीत आहे. त्यांच्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असे ते म्हणाले.

-Ads-

 

राफेल गैरव्यवहाराचा उल्लेख करून ते म्हणाले की अब्जावधी रूपयांच्या या घोटाळ्याचा लाभ अनिल अंबानी यांनाच झाला आहे. आपण अनेक वेळा राफेलचा उल्लेख केला आहे पण त्यावर मोदींनी एका शब्दानेही अजून उत्तर दिलेले नाहीं असे ते म्हणाले. नीरव मोदी, मेहुल चौक्‍सी, ललित मोदी आणि अनिल अंबानींसाठीच मोदींचे सरकार राबले आहे पण या देशातील बेरोजगार युवक, व गरीबांसाठी मात्र त्यांना कोणतीही कणव नाही. देशातील उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी रूपयांचे कर्ज मोदी सरकारने माफ केले आहे पण शेतकऱ्यांचा एक रूपयाही त्यांना माफ करता आलेला नाही असेही ते म्हणाले. राजस्थानातील वसुंधरा राजे सरकारच्या कारभारावरही त्यांनी कडाडून टीका केली. वसुंधरा राजे यांच्या मुलाने ललित मोदींकडून पैसा घेतल्याचा आरोपहीं त्यांनी केला. राजस्थानी, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या मजुरांना गुजरात मधून हाकलून दिले गेले असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)