ढोरजळगाव येथे बिबट्याचा संचार

शेळ्या फस्त, घबराटीचे वातावरण

ढोरजळगाव – शेवगाव तालुक्‍यातील ढोरजळगाव येथे बिबट्याने शेळी फस्त केल्या असून परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
ढोरजळगाव येथील थोरात वस्तीवरील बाळासाहेब थोरात यांची शेळी सोमवारी पहटे उठल्यावर दिसून न आल्याने त्यांनी इतरञ शोध घेतला. मात्र, त्याठिकाणी वन्य प्राण्याचे ठसे आढळून आले. ठशांचा माग घेत पाहणी केली असता बोरीच्या बागात शेळी फाडून खालल्याचे दिसून आले.

यावेळी थोरात यांनी वनविभागाचे सोले यांना सदरील ठशांची पाहणी करण्यासाठी बोलवले असता ठसे हे बिबट्याचे असल्याचे दिसून आले. सध्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वनविभागाने ढोरजळगाव येथील थोरात वस्तीवर त्वरीत पिंजरा लावावा,अशी मागणी बाळासाहेब थोरात, देविदास काळे, संतोष काळे, संदीप काळे, प्रदिप काळे, रामकिसन थोरात, नारायण काळे, बाळासाहेब सोनवणे आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)