ढोकसांगवी शाळेच्या वतीने काढली स्वच्छता दिंडी

अण्णापूर- ढोकसांगवी (ता.शिरुर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.2) सकाळी स्वच्छता दिंडी आणि बालसभा घेण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसंदर्भात फलक हातात घेऊन तसेच घोषणा देत प्रभातफेरी काढून गावात जनजागृती केली. यानंतर शाळेच्या प्रांगणात झालेल्या बालसभेचे नियोजन ग्रीन हाऊसने केले. सुरुवातीला हाऊसमास्टर प्रांजल मलगुंडे, शाळेची कप्टन अपेक्षा गोगडे, मुख्याध्यापिका संगीता पळसकर, तसेच शालेय मंत्रीमंडळ, शिक्षकांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषणातून या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. तसेच शिक्षकांच्या वतीने तंत्रस्नेही शिक्षक संतोष श्रीमंत यांनी महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. या बालसभेचे अध्यक्ष म्हणून इयत्ता सहावीतील ग्रीन हाऊसची हाऊसमास्टर प्रांजल चंद्रकांत मलगुंडे हिने काम पाहिले. सर्वांचे आभार सफ्रान हाऊसची प्रमुख प्रिया ढवळे हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)