ढोकसांगवीचा तेजस इटनकर गुणवत्ता यादीत

अण्णापूर – पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तेजस प्रभाकर इटनकर हा जिल्हा गुणवत्ता यादीत झळकला आहे. त्याला एकूण 226 गुण प्राप्त झाले आहेत. तेजसला वर्गशिक्षिका सविता थोपटे यांनी मार्गदर्शन केले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पाचंगे, उपाध्यक्ष साधना पाचंगे, सरपंच स्वाती मलगुंडे, उपसरपंच रमेश अभंग, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, विस्ताराधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख रामदास विश्वास, श्रीहरी पावशे यांनी तेजस इटनकर आणि मार्गदर्शक सविता थोपटे, तत्कालीन मुख्याध्यापक सखाराम फंड आणि शाळेतील सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)